सेनगाव तालुक्यातील APL केशरी शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू करण्यात आली असुन सदर योजनेअंतर्गत राशनकार्ड मधील प्रतीसदस्य 150 रुपये कुटुंब प्रमुखाचे महीला सदस्यांचे खात्यात जमा करावयाचे आहे तरी सर्व APL केशरी शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, रास्त भाव दुकानदार यांचे कडे अर्जासोबत कार्डातील महिला सदस्यांचे बॅंक खाते पासबुक ची छायाप्रत, आधार कार्ड छायाप्रत, राशन कार्ड छायाप्रत, आपल्या गावातील संबंधित रास्त भाव दुकानदार किंवा संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयात पुरवठा विभागात समक्ष दाखल करावेत असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात येते......आपला जनसेवक परमेश्वर इंगोले पाटील
अनुसूचित जमातीच्या शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना वैयक्तीक, सामुहिक लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि.हिंगोली यांच्या नावे आवश्यक त्या कागदपत्रासह 28 मार्च, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या गंभीर नुकसानाचे राजकारण करण्याची भूमिका विरोधी पक्षाची नाही. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा भागात मोठी गारपीट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, ही गंभीर बाब माजी मंत्री आ. जयंत पाटील साहेब यांनी विधानसभेत मांडली सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने शेतीचे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्यासाठी यंत्रणा नसेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आजच्या आज सरसकट महसूल मंडळाप्रमाणे एकरी काहीतरी मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात द्राक्ष, आंबा, डाळींब, केळी, कांदा अशा अनेक पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप असल्याने हतबलतेची भूमिका शासनाने घेऊ नये, अशी अपेक्षा जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली
Comments
Post a Comment